दोडामार्ग : साटेलीभेडशीतील जी.जे. शाळेची इमारत धोकादायक; नव्या इमारतीची ग्रामस्थांची मागणी

शेअर करा

दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्चूनही दुर्लक्ष; छप्पर कोसळल्याने इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, शासकीय कार्यालये किंवा भाडेतत्त्वावरील दुकाने उभारण्याची मागणी.

दोडामार्ग, दि. २६ जुलै

काही वर्षापूर्वी साटेलीभेडशी खालचा बाजार येथे डिजे शाळा म्हणून एक इमारत बांधली होती या ठिकाणी शाळा देखील भरवली जात होती. काही शासकीय कार्यक्रम यासाठी वापर केला जात होता. इमारत जुनी असल्याने दोन वेळा देखभाल दुरुस्ती वर लाखो रुपये खर्च केले पण या नंतर याकडे दुर्लक्ष झाले ते आजपर्यंत जिल्हा परिषद कडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही यामुळे या इमारतीचे छप्पर कोसळून इतर भाग कोसळून इमारत जमीनदोस्त होणार आहे. तेव्हा संबंधित अधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने ही इमारत पाडून नवीन इमारत बांधून. शासकीय कार्यालये किंवा दुकाने काढून भाडेतत्त्वावर द्यावी अशी मागणी केली जात आहे.


साटेली भेडशी खालचाबाजार वन विभाग कार्यालय जवळ मुख्य रस्त्यावर डिजे शाळा जीर्ण इमारत आहे. या ठिकाणी तेव्हा प्राथमिक शिक्षण धडे दिले जात होते. शिवाय काही कार्यक्रम घेतले जात होते. नंतर ही शाळा बंद झाली. जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या.
साटेली भेडशी बाजारपेठ मधिल डिजे शाळा इमारत छप्पर कोसळून पडले आहे. काही भाग तसेच भिंती तशाच आहेत. या पावसाळ्यात त्या जमीनदोस्त होणार आहे. जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी शासकीय इमारत उभी राहू शकते शिवाय बाजारपेठ असल्याने जिल्हा परिषद या ठिकाणी नवीन इमारत बांधून खाली दुकान गाळे किंवा इतर कार्यालय यासाठी जागा योग्य आहे . जिल्हा परिषद महसूल वाढणार आहे.

शेअर करा