दोडामार्ग, दि. ३० सप्टेंबर
भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
या अभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती सदस्या सन्मा. सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांनी सेवा योगदानासाठी कोनाळ मतदार संघातील घोटगेवाडी गाव दत्तक घेतले आहे.
या अंतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी कृषी विभाग व ग्रामपंचायत घोटगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम सन्मा. सौ. सायली स्वप्निल निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी
घोटगेवाडी सरपंच श्री. श्रीनिवास शेटकर, उपसरपंच श्री. सागर कर्पे, ग्रा. सदस्य सौ. नुतन पांगम, सौ. सुचिता नाईक, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुजय थेटे, कीर्ती विद्यालयाचे सहा. शिक्षक श्री. शरद देसाई सर, श्री. संतोष मेथे सर, कोनाळकट्टा उपसरपंच श्री. रत्नकांत कर्पे, श्री. दत्ताराम देसाई, श्री. नितीन पांगम, आशा सेविका सौ. साक्षी कर्पे, श्री.रूपेश देसाई,श्री. वासुदेव सावंत, श्री. सत्यम सावंत, कीर्ती विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व घोटगेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
