दोडामार्ग : पडवे–माजगाव ते पणतुर्ली रस्त्याच्या निकृष्ट कामावर पालकमंत्री नितेश राणे गंभीर; ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन

शेअर करा

दोन ते चार महिन्यांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे; ग्रामस्थांचा संताप, पत्रकार शिरीष नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

दोडामार्ग, दि. २६ जुलै

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत पडवे–माजगाव ते पणतुर्ली या मार्गाचे नुकतेच डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र काम पूर्ण होऊन अवघ्या दोन ते चार महिन्यांतच या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळेच रस्त्याची ही दुरवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शेअर करा