दोडामार्गात मुसळधार पावसाचा तडाखा; मांगेली-तळेवाडी रस्त्यावर दरड कोसळली

शेअर करा

खोकरल ते मांगेली-तळेवाडी फणसवाडी मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प; जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू, पर्यटक व बससेवा अडकली

दोडामार्ग, दि. १७ जुलै

गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्री पासून जोरदार झोडपून काढायला सुरुवात केली आहे. बळी राजा सुखावला आहे. शेती कामे सुरू झाली आहेत. या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील खोकरल ते मांगेली तळेवाडी फणसवाडी रस्त्यावर डोंगराचा काही भाग रस्त्यावर पडून वाहतूक बंद झाली यामुळे कुठले वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला मांगेली तळेवाडी फणसवाडी रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली याची माहिती बांधकाम विभाग याना मिळताच ती हटवण्यासाठी जेसीबी मशीन घटनास्थळी नेण्यात आले. या ठिकाणी काही तास वाहतूक ठप्प होऊन बसेस तसेच धबधबा ठिकाणी जाणारे पर्यटक अडकून पडले.

शेअर करा