जमीन व्यवहारातील वादातून मारुती धर्णे यांच्यावर कथित हल्ला; पाय फ्रॅक्चर, दोडामार्ग पोलिसांकडून पंचनामा व तपास सुरू.
दोडामार्ग, दि. ६ जुलै
साटेली भेडशी कुडासा तिठा या ठिकाणी हाॅटेल व्यवसायीक मारुती धर्णे यांच्या हाॅटेल मध्ये घुसून साटेली भेडशी गावातील
नितेश नारायण धर्णे, नारायण गणू धर्णे या दोघांनी जमीन व्यवहार मध्ये मी मध्यस्ती करतो असा गैरसमज करून घेऊन शिवीगाळ करत नितेश नारायण धर्णे याने लोखंडी पाईप घेऊन हल्ला केला अशी तक्रार दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दोडामार्ग पोलीसांनी हाॅटेल मध्ये येऊन घटनास्थळी पंचनामा करून कामगार यांचे जाबजबाब घेतले आहे. झालेल्या हल्यात मारूती धर्णे याचा पाय फॅक्चर झाला आहे.
दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे
कुडासे तिठ्यावर माझ्या मालकीचे हॉटेल कोकण पॅलेस आहे. तेथे माझ्या सोबत एकूण तीन कामगार कामास आहेत.
आपण कामात असताना
साटेली भेडशी गावातील रहिवासी नितेश नारायण धर्णे याने आपण जमीन व्यवहार करतो त्यात तू मध्यस्थी करतो असा संशय घेऊन
आपल्या वर कामगार यांच्या समक्ष लोखंडी पाईप घेऊन हल्ला केला असा जबाब दिल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नितेश नारायण धर्णे याने गावातील जमीन खरेदी करण्यासाठी सदर जमीनचे मालक नरेंद्र नारायण धर्णे, रा. साटेली-भेडशी, खैराटवाडी यांचेशी मागील काही महिन्यांपासून व्यवहार सुरू केलेला हे. सदर व्यवहारादरम्याने मी मध्यस्ती करत असल्याबाबत नितेश यास सँशय असल्यामुळे त्याने मला आपल्या मीन खरेदीच्या व्यवहारात मध्यस्ती करू नको असे यापूर्वी सांगितलेले होते. त्यावेळी मी सुध्दा आपण तुझ्या नमीन खरेदीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची मध्यस्ती करणार नसल्याचे त्यास सांगितलेले होते. असे असताना हा हल्ला केला असा आरोप केला आहे. दरम्यान मारुती धर्णे याच्या पायाला फॅक्चर झाले आहे. शिवाय इतर दुखापत झाली आहे.
दरम्यान मारूती धर्णे याला झालेली मारहाण या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांनी रविवारी सायंकाळी कुडासा तिठा येथील हाॅटेल मध्ये भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला कामगार यांचे जबाब घेतले आहेत. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.