दोडामार्ग, दि. २४ जुलै
दोन दिवसांपूर्वी माटणे काटा येथे झालेल्या भिषण अपघातात जखमी झालेल्या माटणे तळेवाडी येथील जयराम शिरोडकर वय वर्षे २४ या तरुणाचे उपचार दरम्यान बांबोळी गोवा मेडिकल कॉलेज येथे निधन झाले. त्याच्या निधनामुळे माटणे गावात शोककळा पसरली आहे.
माटणे काटा दोडामार्ग आयी मार्गावर मोटार सायकल स्कुटर दरम्यान झालेल्या अपघातात मये गोवा येथील दिपक हरमलकर यांचे अपघात ठिकाणी निधन झाले होते, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते यातील जयराम जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी गोवा येथे पाठवले होते पण उपचार सुरू असताना निधन झाले. यामुळे माटणे अपघात मृतांची संख्या दोन झाली आहे.
जयराम शिरोडकर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहीण, असा परिवार आहे. जयराम शिरोडकर याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.