दोडामार्ग : कुंब्रल गावातील गाजलेला कलाकार किशोर सावंत याला इंडियन आयडॉल मध्ये कला सादर करण्याची संधी सर्वञ कौतुक

शेअर करा

दोडामार्ग, दि.२७ जून
दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील रहिवासी तसेच मुंबई या ठिकाणी स्थायिक चाकरमानी किशोर शंकर सावंत, आपल्या विविध कला सादर करून एक वेगळ विश्व निर्माण केले आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, मुलांचे वाढदिवस मध्ये आपल्या कलेचे अविष्कार सादर करत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद घेत दोडामार्ग तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नेले या किशोर सावंत यांच्या कलेची दखल घेत
इंडियन आयडॉल या जगप्रसिद्ध सोनी टीव्हीवरील कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. २८ जून रोजी रात्री आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. किशोर सावंत यांचे कौतुक केले जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावातील किशोर सावंत हास्य अभिनेता, तसेच जादू प्रयोग, लहान मोठया टि. व्ही सीरियल मालिका मध्ये भूमिका कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.

इंडियन आयडॉल या प्रसिद्ध सोनी टीव्ही मध्ये कला सादर करण्यासाठी आॅडिशन घेतले
यात.त्यांच्या कलेला सोनी टिव्ही, परिक्षक यांनी भरभरून दाद दिली असून त्याच प्रक्षेपण २८ जून रोजी रात्री ८ वाजता सोनी टिव्हीवर होणार किशोर सावंत यांचे कार्यक्रम होणार आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील या कलाकाराच संपूर्ण तालुक्यामधे कौतुक होत आहे.या अगोदर त्यानी “महाराष्ट्राची हास्यजत्रा”,पार्टनर अश्या बर्‍याच मराठी हिंदी मालिकामधे सहभाग घेतला आहे

शेअर करा