दोडामार्ग : परमे गावात वीज पुरवठा करणारे वीज खांब झाले वाकडे वीज पुरवठा खंडीत महावितरण यांचे दूर्लक्ष

शेअर करा

दोडामार्ग, दि. २७ जुलै

वीज महावितरण यांच्या सावळ्य गगोंधळामुळे आजही काही गावात वीज समस्या गंभीर बाब बनली आहे. परमे गावात वीज पुरवठा करणारे दोन वीज खांब मुख्य रस्ता शेजारी वाकून खाली आले आहेत यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज प्रवाह झाडी झुडपात उतरून अपघात होण्याची शक्यता आहे. पण वीज महावितरण याना कळवून देखील वाकलेले खांब सरळ करण्यात आले नाही यामुळे परमे गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ग्रामस्थ यांची गैरसोय झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यात वीज खांब उभे करण्यासाठी ज्या ठेकेदाराला काम दिले गेले त्या ठेकेदार याने आणलेले कामगार कडून वीज खांब हे ठराविक फुट खड्डा खोदून नंतर सिमेंट काँक्रिट टाकून ते पडू नये याची जबाबदारी होती पण अनेक गावात काही फुट खड्डा खोदून काम पूर्ण करण्यासाठी खांब उभे करून मोकळे झाले.
ठेकेदार याच्या निष्काळजीपणा मुळे आज अनेक गावात वीज खांब पडत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीज महावितरण अधिकारी यांनी साईटवर राहुन योग्य प्रकारे पारदर्शक काम करुन घेतले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

शेअर करा