दोडामार्ग तालुक्यात तसेच शहरात एम्स अँड कंपनीचा प्रकल्प होऊ देणार नाही या भूमिकेवर मनसे ठाम

शेअर करा

दोडामार्ग, दि. ३० सप्टेंबर

एम्स अँड कंपनीला गावागावातून विरोध असताना सुद्धा मंगळवारी झालेल्या नगरपंचायत मासिक सभेत एम्स अँड कंपनीकडून 25 लाखाची मागणी केल्याचे पुढे आले ही गोष्ट लांजास्पत असून वन संज्ञा असलेल्या जागेत बांधकाम झालंच कसं असा प्रश्न निर्माण होतो नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे एकच वाचा फुटली आणि येथे गदारोळ झाला अशा बांधकामावर नगरपंचायतीने ताबडतोब हातोडा फिरवावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात येते
आज पर्यंत दोडामार्ग तालुक्यातील लोकांनी सरकारला आपल्या कवडीमोल किमतीने जागा दिल्या ह्या पुढे असे प्रकल्प आणून जागा धोक्यात येऊ देणार नाही म्हणून
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव जनतेशा पाठीशी राहील असे शहराध्यक्ष मधुसूदन खांबल आणि मनसे तालुका अध्यक्ष विनायक सावंत यांनी म्हटले

शेअर करा