Dodamarg News : साटेली भेडशी येथील प. पू. राऊळ महाराज स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन भक्तिमय वातावरणात साजरा!

शेअर करा

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य शिबिराचे आयोजन; हजारो भक्तांनी घेतले राऊळ महाराज व अण्णा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन!

दोडामार्ग, दि. ३ नोव्हेंबर

पिंगुळी येथील महायोगी प. पू. राऊळ महाराज यांच्या साटेली भेडशी या ठिकाणी असलेल्या प. पू. राऊळ महाराज स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबीर भजन, किर्तन, नाटय प्रयोग यांनी साजरा करण्यात आला जमलेल्या हजारो भक्तांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला दिंगबरा दिंगबरा राऊळ महाराज दिंगबरा दिंगबरा दिंगबरा अण्णा महाराज दिंगबरा जयघोषात हा सोहळा पार पडला. मोठया संख्येने राऊळ महाराज भक्तगण मंदिरात दाखल झाले होते. हजारो भक्तांनी यावेळी प. पू. राऊळ महाराज यांच्या मूर्ती समोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले तसेच प. पू. श्री अण्णा महाराज यांच्या मूर्ती पादुका दर्शन घेतले. तसेच मंदिराच्या बाहेर कडेला औंदूबर, पिंपळ,वड, या एकञ असलेल्या झाडांना प्रदक्षिणा घालत दर्शन घेतले. साटेली भेडशी राऊळ महाराज मंदीर भक्तांनी फुलून गेले होते.

साटेली भेडशी येथील प. पू राऊळ महाराज मंदिरात दहाव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी पहाटे काकड आरती करून धार्मिक कार्यक्रम सुरुवात करण्यात आली. यावेळी पं. पू. राऊळ महाराज, मूर्ती, पादुका, श्री अण्णा महाराज मूर्ती पादुका, अभिषेक पाद्यपूजा, महाराज यांच्या मूर्ती आकर्षक हार फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. यावेळी जमलेल्या भक्तांच्या उपस्थित सार्वजनिक गाऱ्हाणे घालण्यात आले. या वर्धापनदिनानिमित्त राऊळ महाराज यांचे भक्त सिंधुदुर्ग, गोवा, पंढरपूर, मुंबई, येथून दाखल झाले होते. संपूर्ण मंदीरावर आकर्षण विधुत रोषणाई तसेच मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती.
राऊळ महाराज यांच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच आयोजित मोडत आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला शेकडो रूग्णांनी लाभ घेतला यावेळी सर्व जणांना मोफत औषध गोळया वाटप करण्यात आले. अशा प्रकारे आरोग्य शिबीर पाहून अनेक जणांनी समाधान व्यक्त केले. मॅग्नेटिक अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी मुळे अनेकांना आपल्या शरीरात काय आजार आहेत याची प्रत्यक्ष तपासणी तसेच रिपोर्ट या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाले.

साटेली भेडशी येथील प पू. राऊळ महाराज स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन निमित्ताने
सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ घोटगे, श्री सातेरी महिला भजन मंडळ खानयाळे, सातेरी केळबाय, महिला भजन मंडळ दोडामार्ग, तसेच शेकडो किलोमीटर दूर वरून राऊळ महाराज यांच्या सेवेशी आपली कला अर्पण करण्यासाठी आलेल्या दत्त भजनी संगीत भजन मंडळ बच्चे सावर्डे कोल्हापूर, यांनी सादरीकरण केलेल्या भजनाचे भक्तगण भारावून गेले. हनुमान दामोदर भजन मंडळ भेडशी यांनी आपली कला सादर केली.

शेअर करा