दोडामार्ग : श्री देवी शांतादुर्गा देवस्थान विश्वस्त निवडणुकीत ‘श्री देवी शांतादुर्गा पॅनल’चा दणदणीत विजय

शेअर करा

प्रकाश सखाराम गवस यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. धर्मादाय सहआयुक्त, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार झालेल्या निवडणुकीत पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले

दोडामार्ग, दि. २९ जून
मा. धर्मादाय सह आयुक्त, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार श्री देवी शांतादुर्गा देवस्थान, उसप (नों. क्र. ए-410) च्या विश्वस्त मंडळाच्या दि. 28 जून 2026 रोजी झालेल्या निवडणुकीत श्री देवी शांतादुर्गा पॅनलने 6 पैकी 5 जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. या विजयी पॅनलचे नेतृत्व श्री. प्रकाश सखाराम गवस यांनी केले.
नवनिर्वाचित विश्वस्तांनी यापूर्वीही देवस्थानचा कारभार प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे सांभाळला असल्याने मानकरी व भाविकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला. हा विजय वंशपरंपरागत हक्कांचा, मानकऱ्यांच्या एकजुटीचा आणि श्री देवी शांतादुर्गा मातेच्या कृपाशीर्वादाचा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नवनिर्वाचित मानकरी विश्वस्त :
सातेरकर मानकरी : श्री. प्रदिपसिंह इंद्रसेन देसाई, श्री. विरसेन प्रतापराव देसाई
ब्राम्हणीकर मानकरी : श्री. प्रकाश सखाराम गवस, श्री. राजेश वासू गवस
केळबेकर मानकरी : श्री. भूपेश नारायण गवस
घाडीवसकर मानकरी : श्री. भरत अर्जुन गवस
ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. द. ल. सावंत, तसेच निरीक्षक श्री. सत्यनारायण पुंडलिक शेणॉय व श्री. बापू शिवराम जाधव (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कोल्हापूर विभाग) यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली.
विजयानंतर उसप गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित विश्वस्तांनी या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, मानकरी व भाविकांचे आभार मानले. लवकरच कार्यभार स्वीकारून देवस्थानचे सर्व धार्मिक व सामाजिक उपक्रम पूर्ववत सुरू करण्यात येतील, अशी माहिती नव्या विश्वस्त मंडळाने दिली.

शेअर करा