दोडामार्ग : कोनाळकटट्टा येथे वीज वाहिन्यांव आआलेली झाडे फांद्या तोडायला सुरूवात उशिरा सुचले महावितरण विभागाला शहाणपण

शेअर करा

दोडामार्ग, दि. २६ जुलै

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांवर आलेली झाडे, फांद्या, वेली तोडायला वीज महावितरण अधिकारी यांना उन्हाळ्यात जमले नाही. पाऊस सुरू होण्यापूर्वी ते करायला हवे होते पण झाले नाही यामुळे दोडामार्ग तालुका तीन चार दिवस तर काही गावे दहा दिवस अंधारात राहीली. आणि आता वीज महावितरण अधिकारी यांना शहाणपण सूचले आहे. कोनाळकटट्टा येथील वीज वाहिन्यांवर आलेली झाडे फांद्या क्रेन माध्यमातून तोडायला सुरूवात केली आहे .

शेअर करा