दोडामार्ग: उसपमध्ये प्रस्तावित खडी क्रशरला ग्रामस्थांचा तीव्र विरोध;काँग्रेसचा पाठिंबा

शेअर करा

गायरान जमीन गोवा येथील उद्योजकाला उत्खनन व खडी क्रशरसाठी देण्याच्या हालचालींचा आरोप; उसप गावात असा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी दिला.

दोडामार्ग,दि.१४ जुलै

उसप गावातील ग्रामस्थ याना अंधारात ठेवून दोडामार्ग तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी येथील गायरान जमीन गोवा राज्यातील एका उद्योजक याला काळा दगड उत्खनन तसेच खडी क्रशर करीता देत आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा प्रकल्पाला उसप गावात थारा देणार नाही. उसप गावातील ग्रामस्थ याना राष्ट्रीय काँग्रेस वतीने पांठीबा देऊन या खडी क्रशर खाणीला विरोध करणार असे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी सांगितले.

उसप गावातील गायरान जमीन सर्व्हे नंबर ३६०/१७२/ या ठिकाणी महसूल विभाग कडून गौण खनिज काळा दगड खडी क्रशर खाणीला परवानगी देण्यासाठी पणजी गोवा येथील एम. एन. नायर याने अर्ज केला आहे त्यानुसार ही जमीन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत याला गावातील ग्रामस्थ माजी सरपंच यांनी विरोध केला आहे. गावातील ग्रामस्थ याना काही माहिती नाही मंडळ अधिकारी आपले कारनामे करत आहेत. असा आरोप बाबू गवस यांनी केला.
उसप गावातील सदर जमीन पाहण्यासाठी अर्जदार नायर जमीन ठिकाणी उपस्थित राहणार आहे . १५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता उपस्थित राहावे अशी नोटीस फक्त पोलीस पाटील याना दिली आहे. बुधवारी पाहणी हे पञ सोमवारी काढण्यात आले आहे. घाई घाईत पञ काढले आहे यामुळे सर्व संशयास्पद आहे.

उसप गावात अशा प्रकारे काळा दगड उत्खनन खडी क्रशर कुञीम वाळू प्रकल्प बाबत गावात जन सुनावणी आवश्यक आहे. पण ती घेतली नाही. उसप गावातील ग्रामस्थ याना अंधारात ठेवून महसूल विभाग गोवा येथील उद्योजक याना सहकार्य करत आहेत. तेव्हा उसप गावातील बागायती उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाला राष्ट्रीय काँग्रेस विरोध करणार असे बाबू गवस यांनी सांगितले.

शेअर करा