दोडामार्ग : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दोडामार्ग केंद्रशाळा क्र. १ येथे योग प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

शेअर करा

दोडामार्ग, दि.२१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जि. प. केंद्रशाळा दोडामार्ग क्र. १ येथे योग प्रबोधन व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सिद्ध समाधी योगाचे गुरु मा. नितीन गवस यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले.

त्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांकडूनही त्यांचा सराव करून घेतला. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न व एकाग्र राहते, तसेच विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.

या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला. देशभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला

शेअर करा