शालेय विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा
⭕प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉचेही आयोजन
देवगड,दि.०४ सप्टेंबर
फ्रेंडस् सर्कल, देवगड सडा यांच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता फ्रेंडस् सर्कल नाका येथे भव्य दहिहंडी उत्सव २०२६ चा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा तसेच भव्य ‘लकी ड्रॉ’चेही आयोजन करण्यात आले आहे.
या दहिहंडी उत्सवात निमंत्रित गोविंदा पथके सलामीसाठी सहभागी होणार आहेत. तसेच राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेतील ‘बेस्ट कृष्णा’साठी प्रथम क्रमांकाला रोख २ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख १ हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख ५०० रूपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर ‘बेस्ट राधा’साठी प्रथम क्रमांकाला रोख २ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास रोख १ हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रोख ५०० रूपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील ५ ते १२ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना सहभाग देण्यात येणार आहे. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मुलांमध्ये १५ व मुलींमध्ये १५ मिळून पहिल्या ३० स्पर्धकांना संधी देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी तनिश बिडये (८६२३०६०५४७) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच लकी ड्रॉ अंतर्गत गृहोपयोगी बक्षीसे जिंकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहेत. या लकी ड्रॉच्या कुपनसाठी २० रूपये इतके माफक शुल्क आकारण्यात आले आहे. एलईडी टीव्ही, साऊंड बार, मोबाईल फोन, टेबल फॅन, इंडक्शन, मिक्सर, इस्त्री, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ इअरफोन, १० लीटर कलर आदी बक्षीसे लकी ड्रॉमध्ये ठेवण्यात आली आहेत. विजेत्या कुपनधारकास कार्यक्रमस्थळी उपस्थित असणे बंधनकारक आहे. लकी ड्रॉची कुपन्स भालचंद्र पानशॉप, हॉटेल संतोषीनजीक देवगड येथे उपलब्ध आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व दहिहंडी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फ्रेंडस् सर्कलच्यावतीने करण्यात आले आहे.