जामसंडे व तारामुंबरीतील शोकाकुल कुटुंबीयांची सुशांत नाईक यांनी घेतली सांत्वनपर भेट

शेअर करा

प्रणील धोपटे व सुहासिनी जोशी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक; कार्यकर्त्यांसह कुटुंबीयांचे केले सांत्वन

देवगड,दि.३१ जुलै

देवगड तालुक्यातील जामसंडे येथील रहिवासी अशोक गणपत धोपटे यांचे सुपुत्र प्रणील अशोक धोपटे (वय ३३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तसेच तारामुंबरी येथील रहिवासी व शिवसैनिक धनंजय जोशी यांच्या मातोश्री सुहासिनी तुकाराम जोशी (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

या दोन्ही दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी संबंधित शोकाकुल कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.

याप्रसंगी चंदन मामघाडी, तेजम मामघाडी, गणेश गावकर, विकास कोयंडे, प्रशांत शिंदे तसेच काँग्रेसचे देवगड तालुका अध्यक्ष कुलकर्णी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत शोकाकुल कुटुंबीयांना धीर दिला.

शेअर करा