कणकवली : महामार्ग वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहन चालकांवर धडक कारवाई

शेअर करा

३ ट्रक चालकांनी न्यायालयात भरला तीस हजार रुपये दंड;ट्रक चालकांची मद्यचाचणी करताना महामार्ग पोलीस

कणकवली,दि.१५ जुलै
महामार्ग वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांवर धडक कारवाई केली. यामध्‍ये तीन ट्रक चालकांनी न्यायालयात प्रत्यकी १० हजार प्रमाणे ३० हजार रुपये दंड भरला.या कारवाईत सातत्‍य ठेवले जाणार असून वाहन चालकांनी मद्य सेवन टाळावे असे आवाहन महामार्ग पोलीस मदत केंद्र कसालचे पोलीस उपनिरिक्षक जयराम पाटील यांनी केले आहे.


संपूर्ण राज्यात मद्यसेवन करून वाहन चालविल्याने गंभीर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.त्या अनुषंगाने वाहन चालकांवर आळा बसविण्यासाठी अलिकडेच पदभार घेतलेले पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी मद्यपी चालकांवर धडक कारवाईचे आदेश महामार्ग पोलिसांना दिलेले आहेत. महामार्ग पोलीस अंमलदार प्रकाश गवस, हवालदार श्री.बिर्जे, एकनाथ सरमळकर , पोलीस नाईक, नितीन शेट्ये, पोलीस कॉ.लक्ष्मण परब, रवि इंगळे,पांडुरंग खडपकर या अंमलदारानी वैभववाडी तळेरे या राज्यमार्गावर 3 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. त्‍यांनी कणकवली न्यायालयात प्रत्येकी 10,000 प्रमाणे एकूण 30,000 दंड भरणा केला. मागील महिन्यात महामार्गावर 4 मद्यपी वाहन चालकावर अशीच कारवाई केलेली होती.त्यांचे कडून एकूण 40,000 असा एकूण 70,000 रुपये दंड न्यायालयात मद्यपी चालकांनी भरलेला आहे

शेअर करा