कणकवली कनकनगर रस्ता रुंदीकरणाला सुरुवात, सुशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

शेअर करा

कणकवली,दि.११ ऑगस्ट

कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच कनकनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी आणि परिसराच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, कनकनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.या कामासाठी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्वखर्चातून सहकार्य केले. तसेच कनकनगर येथील नागरिकांनीही रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक सहकार्य केले.

रस्ता रुंदीकरणामुळे अवजड तसेच मोठ्या वाहनांची ये-जा अधिक सुलभ होणार असून, परिसरातील वाहतुकीची कोंडी आणि अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कनकनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यामुळे हे काम मार्गी लागण्यास मोठी मदत झाली.

दरम्यान, सुशांत नाईक यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. काम योग्य पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी संबंधितांशी चर्चा करून आवश्यक सूचना केल्या.

यावेळी बाबू जाधव, प्रवीण सावंत, हर्षद शिकरे, संतोष सावंत, मोर्ये काका आदी उपस्थित होते.

शेअर करा