अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेडच्या गूळनिर्मिती प्रक्रियेची घेतली माहिती; कृषीआधारित उद्योग उभारणीसाठी शेतकरी व उद्योजकांना आवाहन
कणकवली,दि.१४ ऑक्टोंबर
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड या गूळ उत्पादन प्रकल्पालाही भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला गूळ उद्योग प्रकल्प म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या या प्रकल्पातील उत्पादन प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली. गूळ निर्मितीची पद्धत, उत्पादनाचे विविध टप्पे आणि उद्योगाचे कामकाज याविषयी त्यांनी जाणून घेतले. स्थानिक पातळीवर कृषीआधारित उद्योगांची उभारणी आणि उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून उत्पादननिर्मितीला चालना देण्यासाठी असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी शेतकरी आणि उद्योजक यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.