आ. निलेश राणे यांच्यामुळे मिळाली ताकद ; कणकवली शहरवासियांचा आशिर्वाद असल्याने विजय
कणकवली,दि.०१ जुन
कणकवली नगरपंचायत निवडणूक आम्ही ही शहर विकास आघाडी म्हणून लढवली होती. या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा कौल आपल्याला घ्यायचा होता , म्हणून सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांनी एकच येऊन शहर विकास आघाडी करून हा विजय मिळवलेला आहे. जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि प्रत्येकाच्या योगदानात प्रत्येकाची जी मदत आहे , त्या मदतीतून हा कणकवली शहराचा कौल मिळालेला आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी पुढाकार घेवून ही शहरविकास आघाडी केली होती. त्यात आ. निलेश राणे यांची ताकद मिळाली.कणकवली शहरवासियांचा आशिर्वाद असल्याने विजयी झाल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली शहरविकास आघाडीत माजी आ. वैभव नाईक , राजन तेली, परशुराम उपरकर , सुशांत नाईक , संजय आग्रे यांच्यासह , काँग्रेस , राष्ट्रवादी , आरपीआय , बहुजन विकास आघाडी अशा सर्वच नेत्यांच्या पुढाकाराने आम्ही सर्वांनी मिळून शहर विकास आघाडीची स्थापना केली. कणकवलीकरांच्या आशीर्वादाने मिळवलेल आहे. पण यामध्ये सर्वांचाच फार मोठा वाटा आहे. सगळ्या पक्षांनी मिळून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शहर विकास आघाडीला कौल दिला.
लोकांच्या समस्या, रस्त्यावर पडलेले खड्डे . रस्त्याचे डागडूजीकरण , भूमिगत विद्युत वाहिनी, डांबरीकरण त्यानंतर होणार काँक्रीटीकरण या सगळ्या बाबतीमध्ये तीन ते चार वेळा त्या ठिकाणी नगरपालिकेने जावून बघितले आहे. लवकरच पावसाळ्या नंतर तो रस्ता चांगला झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसेल.
दरम्यान, नाका चौक ते कडकोली परिसरातील रस्त्याची दुरवस्था नागरिकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. पावसाळा तोंडावर असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. प्रशासकीय कार्यकाळात या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २५ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर काही निविदांबाबत आक्षेप घेतल्याने प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे.
भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पासाठी मारुती मंदिर ते नाका चौक दरम्यान रस्ता खोदण्यात आला होता. त्यानंतर चर बुजविण्याचे काम करण्यात आले असले तरी सध्या त्या भागात पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजविण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण केले जाणार आहे. कणकवली नगरपंचायतच्यावतीने निविदा प्रक्रियेचा अंतिम निर्णय झाल्यानंतर नाका चौक रस्त्याचे २५ लाख रुपयांच्या निधीतून डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या संपूर्ण मार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचाही पालिकेचा मानस आहे. रस्त्यालगत सध्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने भविष्यात दोन्ही बाजूंना भूमिगत गटारांची उभारणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.