कणकवली : गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सन्मवयाने काम करावे

शेअर करा

नगराध्यक्ष संदेश पारकर : गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत कणकवली नगरपंचायतची बैठक

कणकवली,दि.०३ सप्टेंबर

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसह नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. नगरपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, एसटी प्रशासनासह या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गणेशोत्सव निर्विघ्नपणे शांततेत पार पाडावा, अशी सूचना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिल्या.


कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, सत्यजित उर्फ बाळू पारकर, लुकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा अंधारी, पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, महावितरणचे शाखा अभियंता ओमकार माळी, कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय गायकवाड, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, न.पं.चे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.


गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी चाकरमान्यांसह ग्रामीण भागातील नागरिक कणकवली शहरात मोठ्या संख्येने येतात. त्यांना गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करताना त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता नगरपंचायत प्रशासनाने घ्यावी, सूचना श्री. पारकर व नगरसेवकांनी केल्या. खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक बेशिस्तपणे वाहने पार्क करतात. परिणामी शहरात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात ८ ठिकाणी असलेली वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन काही ठिकाणी नो-पार्किंग तर काही ठिकाणी एक दिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करा.


शहरातील पार्किंगची समस्या आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करण्यात आले. मुख्य बाजारपेठेत सम-विषम पार्किंग व्यवस्था तसेच वन-वे वाहतूक लागू करण्याबाबत चर्चा झाली. पटवर्धन चौक ते पोलीस स्टेशन नो पार्किंग असेल .शहरातील सर्व्हिस रोडवर असणारे अंडरपास परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करावी, अशा सुचना संदेश पारकर यांनी दिल्या.


कणकवली शहरातील रिक्षा स्थानकांमध्ये रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महामार्ग प्राधिकरणाच्या आरओडल्ब्यू लाईनचा विचार करून शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे. मंजुनाथ ते श्रीधर नाईक सर्व्हिस रोड तसेच पुलाखालील भागात व्यवसाय करणाºया विक्रेत्यांसाठी हिरवे शेडनेट उभारून त्यांना नियोजित जागेत बसविण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. त्यामुळे रस्त्यालगत होणारी गर्दी आणि वाहतुकीतीला अडथळे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुचाकी पार्किंग बँक आॅफ इंडिया समोरील रिकाम्या जागेत होईल. इतर पार्कींग जागा लवकर जाहीर केल्या जातील. गणेशोत्सव काळात शहरातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने खबरदारी घ्यावी, कणकवली शहरासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी वीज वितरण अधिकाºयांकडे करण्यात आली.


शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठीही उपाययोजना करण्याची गरज व्यापाºयाºयांकडून बैठकीत व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सव काळात गर्दी वाढणार असल्याने मोकाट जनावरांमुळे अपघात होऊ नयेत, यासाठी नगरपंचायतीने कार्यवाही करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली. यावर संदेश पारकर यांनी या संदर्भात चर्चा करून ही समस्या मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले.

शेअर करा