दहावी बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
कणकवली,दि.३० जुलै
कलमठ बिडयेवाडी समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी गुरुपौर्णिमा भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी येथील दहावी बारावी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ही साजरा करण्यात आला.
काल देशभर गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा होत असताना कणकवली कलमठ बिडयेवाडी समर्थ नगर येथील श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी सुद्धा गुरुपौर्णिमा उत्सव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये पूजा, अभिषेक, लघुरुद्र, लघुयाग व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी बबन मेस्त्री यांची भजन सेवा स्वामी चरणी अर्पण करण्यात नंतर श्री समर्थाचे नामस्मरण व आरती करण्यात आली.
दरम्यान यावेळी गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ मठाचे मालक प्रसाद कबरे यांनी बिडयेवाडी मधील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अश्विनी पुजारे, ईश्वरी लाड,स्नेहल मस्तमर्डी, जान्हवी नाडकर्णी,दक्ष लाड,हार्दिक पुजारे, हर्षाली मेस्त्री,वैष्णवी देसाई, मंजुनाथ यादव, अनुज परब, सोहम आनंदा कांबळे, सुलेख राजेंद्र सावंत, मिताली मुकुंद शिर्के, गौरी सुनील खोचरे,जान्हवी रविकांत लाड, श्रद्धा मस्तमर्डी, शुभम लाड,पांडुरंग देसाई, शिल्पा गावडे,प्राप्ती प्रसाद कबरे, कैवल्य स्वरूप कबरे आदी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र, भेटवस्तू व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कणकवलीतील उद्योजक सुनील दादा नाडकर्णी, कुबल सर,पत्रकार संजय सावंत, कलमठच्या माजी सरपंच धनश्री मेस्त्री, श्रीकृष्ण आचरेकर, परब गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील दादा नाडकर्णी म्हणाले, परीक्षेमध्ये आता कोणाला किती टक्के पडले हे महत्त्वाचे नाही कारण आज ज्याला ६०% मिळाले तो पुढे मेहनतीच्या जोरावरती ८०% टक्के गुणापर्यंत जर मारू शकतो म्हणून जर तुम्हाला भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर पुढील पाच वर्ष जीवापाड मेहनत, कष्ट करा म्हणजे पुढील आयुष्य सुखी होईल पण आज जर मजा करण्यात दिवस घालवलात तर पुढील आयुष्याचे काही खरे नाही. असा मौलिक सल्ला यावेळी दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे परब गुरुजी यांनी यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आई वडिलांचे आपल्या जीवनातील प्रथम गुरु म्हणून महत्त्व सांगणारी कथा उपस्थित असताना सांगत कार्यक्रमांमध्ये रंगत आणली.
श्री स्वामी समर्थ मठ कलमठ बिडेवाडी येथे आज झालेल्या ग्रुप पौर्णिमा उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत त्यांचा आशीर्वाद घेतला.