कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील हळवळ फाट्यावर हायमास्ट दिव्यांची सुविधा

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कार्यवाही ; रात्रीच्या अंधाराचा प्रश्न लागला मार्गी

कणकवली,दि.१४ सप्टेंबर

हळवळ फाटा येथे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार राहत असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार हळवळ फाट्यावर महामार्ग प्राधिकरण कडून हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत.

हळवळ फाटा हा महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून येथे रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने अपघात होत होते.वाहनचालक, स्थानिकांकडून या ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आली. त्यानंतर हळवळ फाट्यावर हायमास्ट उभारण्यात आले असून परिसर प्रकाशमान होणार आहे.

या सुविधेमुळे रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक सुरक्षिततेलाही हातभार लागणार आहे.
याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ही सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा