Kudal News : पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा

शेअर करा

मा.आ.परशुराम उपरकर, मा.आ. वैभव नाईक,अमित सामंत,अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ,दि.३० ऑक्टोंबर

      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करून तेथील पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तेथील तलाव स्वमालकीचे दाखवून त्याची जाहिरात करून प्लॉट विक्री केली जात आहे. १८५० नळधारक ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.मात्र या गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी थेट तलावात मिसळले जाणार असल्याने त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा असलेला मुख्य स्त्रोत प्रदूषित होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असून या विरोधात  पिंगुळीतील  स्थानिक ग्रामस्थांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून आंदोलनाचा आणि उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलन आणि उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज  पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेसचे विजय प्रभू,सचीन ठाकूर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदि उपस्थित होते.

शेअर करा