दोन दिवसांत पत्रकार परिषदेत करणार भांडाफोड..
कणकवली,दि.२६ मे
शिंदेसेनेचे कुडाळ – मालवण मतदार संघांचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत
धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक दहीकर देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार आहे. दोन दिवसांनी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे’, अशी पोस्ट
आमदार निलेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ समाज माध्यमावर केली आहे. त्यामुळे दोन दिवसात आमदार राणे नेमका कोणता खुलासा करणार
याबाबत जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.