कणकवली उड्डाण पुलाखालील स्टॉल आजच हटविण्याच्या सूचना…

शेअर करा

अन्यथा,नगरपंचायतची कारवाई ; स्टॉलमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारानंतर नगरपंचायतचा इशारा..

कणकवली,दि.१७ जुलै

कणकवली शहरातील बसस्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली लावण्यात आलेले सर्व स्टॉल आज दिवसभरात स्वखर्चाने हटवावेत, अन्यथा नगरपंचायत प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायतीने सर्व स्टॉलधारकांना दिला आहे.

कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाण पुलाखालील एका स्टॉलमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची घटना समोर आल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कडक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील सर्व अनधिकृत स्टॉल हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नगरपंचायत प्रशासनाने स्टॉलधारकांना स्वयंस्फूर्तीने स्टॉल हटविण्याचे आवाहन केले असून, दिलेल्या मुदतीनंतरही स्टॉल कायम आढळल्यास जेसीबी व संबंधित यंत्रणांच्या मदतीने हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानास संबंधित स्टॉलधारक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शेअर करा