कणकवली : कणकवली शहर मंडळात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शेअर करा

मोदी@१२ अभियान अंतर्गत भाजपकडून योगासनांचे आयोजन

कणकवली,दि. २१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मोदी@१२ अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली शहर मंडळ भाजपच्या वतीने योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यंदाही कणकवली शहर मंडळात योगासनांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून आरोग्य, मानसिक शांतता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

योगासनांचे महत्त्व आणि त्याचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमास मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक मेघा गांगण, गटनेत्या सुप्रिया नलावडे, प्राची कर्पे, उपाध्यक्ष संजना सदडेकर, सरपंच सचिन पारधीये, पपु पुजारे, अभय गावकर, सर्वेश दळवी, विजय चिंदरकर, संतोष गुरव, रोहित घाग आदी उपस्थित होते.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे प्रतिनिधी म्हणून रो. ॲड. दीपक अंधारी, रो. गुरुनाथ पावसकर, रो. लवू पिळणकर उपस्थित होते.

योग प्रशिक्षक म्हणून रो. प्रमोद लिमये आणि रो. संतोष कांबळे यांनी उपस्थितांना योगासनांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा