कणकवली : उपवर्गीकरणविरोधातील मोर्चा सहभागी व्हा

शेअर करा


भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांचे आवाहन


कणकवली,दि.२८ जून

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास विरोध करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने ३० जूनला विधीमंडळावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चा दुपारी १२ वा. मेट्रो सिनेमा ते सीएसएमटी, आझाद मैदान मार्गे विधीमंडळावर काढण्यात येणार आहे. या मोर्चात डॉ. भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, राजकुमार बडोले, बबनराव घोलप यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तरी या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह््यातील अनुसूचित जाती, संघटना, संस्था, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले आहे.

शेअर करा