कणकवली: कै. गुरुवर्य सावंत बाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त डामरे कानडेवाडीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

शेअर करा

२६ जुलै रोजी श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम; रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन.

कणकवली,दि.२२ जुलै

श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे कानडेवाडी मठाचे संस्थापक कै. गुरुवर्य. श्री सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतीदिनानिमित्त डामरे कानडेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ देवस्थानचे अध्यक्ष. श्री. साईनाथ रमेश सावंत आणि स्वामी सेवेकरी मंडळाने केले आहे…

शेअर करा