कणकवली : बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पहाणी

शेअर करा

कणकवली,दि.३१ मे


कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शहरातील बांधकरवाडी परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. बांधकरवाडी येथील गणपती साना जागेसंदर्भातील मागणी तसेच बांधकरवाडी तिठा परिसरातील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या गतिरोधकांची पाहणी करण्यात आली. याशिवाय परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचाही आढावा घेण्यात आला.

यावेळी तेजस राणे, नगरसेवक लुकेश कांबळे, नगरसेवक स्वप्नील राणे, माजी नगरसेवक सदानंद राणे, आबाजी राणे, अमृत राणे, सुमित राणे, दत्ताराम साटम, मारुती राणे, बाळा राणे, नाना राणे, विष्णू राणे, प्रविण सावंत, वसंत राणे, रामदास मांजरेकर, हरेश निखार्गे, निकीत मुरकर, संतोष आमडोसकर तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा