कणकवली,दि.०५ ऑगस्ट
कणकवली पोलीस निरीक्षक पदाचा पदभार कमलेश बच्छाव यांनी स्वीकारला आहे. पदोन्नतीनंतर त्यांची कणकवली येथे बदली झाली असून त्यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी कमलेश बच्छाव हे ठाणे ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ठाणे ग्रामीण येथे सेवा बजावताना त्यांनी विविध गुन्ह्यांच्या तपासात तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
पदोन्नतीनंतर कणकवलीसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांना तत्पर, पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीस सेवा देण्यावर भर राहील, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व्यक्त केला