पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा भांडारी समाजाला दिला शब्द
कणकवली,दि.१६ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळमध्ये व्हावे ही आपल्याकडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पूर्ण करणारच असा शब्द आज सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा भंडारी भवन व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील भंडारी समाजाने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा पाठपुरावा पूर्ण करुन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला म्हणून आज जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने आभार मानून भवनासाठी निधी देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
कुडाळ येथे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी भूखंड:
यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले की, कुडाळ येथील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी भूखंड मंजूर करुन गेले वर्षभर शासकीय यंत्रणा कामाला लावून कायदेशीर सोपस्कार महसूल यंत्रणेने पुर्ण केल्याने आता राज्य शासनाकडे पाठपुरावा आपण करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
भंडारी समाजाचे भूषण म्हणजे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह :
यावेळी भंडारी समाजाचे अतुल बंगे आणि राजू गवंडे म्हणाले की, कुडाळ येथे भंडारी समाजाचे भूषण मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे बांधकाम झाले. त्याला चालना देऊन उर्वरित काम पूर्ण करण्याचे आमदार निलेश राणे यांनी भरीव काम केले आहे.
गणेशोत्सव काळात भंडारी भवनाचे भूमिपूजन:
यावेळी जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हा अध्यक्ष हेमंत करंगुटकर म्हणाले की, या वर्षी गणेशोत्सव काळात पालकमंत्री नितेश राणे यांची वेळ घेऊन भूमिपूजन सोहळा भव्य दिव्य स्वरुपात करणार आहोत.
जिल्ह्यातील भंडारी समाज हा पालकमंत्री नितेश राणे यांचा ऋणी राहील असे भंडारी समाजाचे जेष्ठ नेते लक्ष्मीकांत मुंडये यांनी सांगितले. “अतुलजी तुम्हाला दिलेला शब्द पुरा केला ना मग आता पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा”, असे या भंडारी भवनासाठी पाठपुरावा करणारे अतुल बंगे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, जिल्हा सचिव हेमंत सावंत, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी दीवाकर म्हाळवणकर, भंडारी समाजाचे नेते लक्ष्मीकांत मुंडये, शिक्षक नेते राजन कोरगावकर, कणकवली भंडारी समाजाचे निलेश गोवेकर, कसाल भंडारी समाजाचे मारुती वायंगणकर आदी उपस्थित होते.