कणकवली : लाभार्थ्यांच्या चेह-यावर असलेला आनंद हेच आमच्या सरकारचे यश -मंत्री नितेश राणे

शेअर करा


करंजे येथे आदिवासींना प्रधानमंत्री जन मन योजनेतून चार कुटुंबांना मिळाले हक्काचे घर ;
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते चाव्या सुपूर्द

कणकवली,दि.१५ जून*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. गरजू व वंचित घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री जन मन योजनेतून चार कुटुंबांना मिळाले हक्काचे घर मिळाल्याचा लाभार्थ्यांच्या चेह-यावर असलेला आनंद हेच आमच्या सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन , पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
प्रधानमंत्री जन मन आवास योजना अंतर्गत करंजे गावातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी लाभार्थ्यांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. या गृहप्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री, ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत करंजे येथे प्रधानमंत्री जन मन आवास योजना अंतर्गत चार घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. विशेष म्हणजे मंजूर झालेली सर्व चारही घरकुले पूर्ण झाली आहेत. या योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब व श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी एकूण ४ आर जमीन बक्षीसपत्राद्वारे दिली. या घरकुलांसोबत लाभार्थ्यांना सोलर पंपाद्वारे पाणी सुविधा तसेच वीज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनमानात मोठा बदल घडणार आहे.

1 लाख 4 हजाराचे अनुदान विकसित

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी प्रति लाभार्थी ३१ हजार ३०५ रुपये प्रमाणे चार लाभार्थ्यांना एकूण १ लाख २५ हजार २२० रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जन मन योजनेतून प्रत्येक घरकुलासाठी २ लाख रुपये अनुदान देण्यात आले असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरीपोटी १ लाख ४ हजार ५२० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

शेअर करा