मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून उड्डाणपूलाखाली ल सुशोभिकरणासाठी मंजूर झाला निधी ; नगराध्यक्षांनी जनतेची दिशाभूल करु नये
कणकवली,दि.२१ मे
कणकवली नगराध्यक्षांनी उड्डाण पुलाखाली सुशोभीकरणाबाबत माहिती दिली. त्यात १ कोटी 50 लाखांचे काम मंजूर झाले आहे,त्याची मंजुरी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून दिली आहे. खा.नारायण राणे यांच्या सूचनेनुसार व व्यापा-यांच्या मागणीनुसार मुख्य चौकातील विद्रुपीकरण झालेले चित्र बदलण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. परंतु, नगराध्यक्ष संदेश पारकर हे श्रीधर नाईक चौक येथील उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्याचे सांगताहेत . ज्या ठिकाणी अत्यावश्यक काम आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण करावे. ज्या घोषणा सुशोभीकरणाच्या केल्या त्या नियमात बसताहेत का ? मुळात सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर निविदा रद्द करत केवळ जनतेला खड्डयाच्या रस्त्यातून प्रवास करायला लावले आहे. सत्ताधा-यांनी निविदा रद्द करुन काय साध्य केले ? असा सवाल माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण उपस्थित होते.
महामार्ग प्राधिकरणकडून नगरपंचायतला केवळ सुशोभीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. या उड्डाणपुलाखाली न्यायालयाच्या निर्देशानुसार कुठलेही पक्के बांधकाम करता येणार नाही. कणकवली शहरातील व्यापा-यांनी उड्डाणपुलाखाली ल एक भाग विकसित करण्याबाबत मागणी केली होती. मात्र, ते आता काहीही बोलताना दिसत नाहीत. संदेश पारकर यांनी काम मंजुर झाल्याबाबत माहिती दिली. ते काम दीड कोटीचे नव्हेंबर मध्येच मंजुर झाले होते. मात्र, निवडणूक आचारसंहिता लागल्यामुळे ते पुढे गेले होते. मुख्य चौकातील सुशोभिकरण करण्यासाठी हा निधी मंजुर झालेला आहे तो निधी नरडवे नाका येथील सुशोभीकरणासाठी वळवू नये , कारण महामार्ग प्राधिकरणला तेथील विकासासाठी निधी दिला गेला आहे. ते काम श्रीधर नाईक चौक येथील उड्डाणपुलाच्या खाली होणार आहे. आता पटवर्धन चौकात नवीन दुकाने होत आहेत, त्यांचे हप्ते आहेत का?असा सवाल बंडू हर्णे यांनी व्यक्त केला.
सत्ताधा-यांनी 21 निविदा प्रक्रिया रद्द केल्या. कणकवली शहरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही कामे होणार होती . त्यावेळी निविदा रद्द होताना पावसाळा जवळ असल्याने आम्ही विरोध केला होता. आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. आता आचरा रोड,मराठा मंडळ , परबवाडी यासह विविध 11 रस्त्यांची कामे रखडली असून येथील नागरिकांना चालायला नको, अशी परिस्थिीती निर्माण झालेली आहे. त्याला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची टीम जबाबदार आहेत. त्यावेळी नियमानुसार त्या कामांसाठी 14 ठेकेदार आले होते,21 कामे होती. झालेल्या ठरावाविरोधात मुख्याधिकाऱ्यांनी दाद मागण्याची गरज होती.जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे,तरीही कामे रद्द करण्यात आली. मात्र, याबाबत मुख्याधिकारी देखील याचे उत्तर मंत्री राणेंना उत्तर द्यावे लागेल. केवळ सत्ताधा-यांचा ठेकेदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप बंडू हर्णे यांनी केला आहे.