कुडाळ : महावितरणकडून घोटगे गावातील वीज समस्या मार्गी

शेअर करा

जीर्ण वीज खांब, वीजवाहिन्या बदलल्या;सामाजिक कार्यकर्ते चेतन ढवळ यांच्या प्रयत्नांस यश

कुडाळ, दि. २७ मे

कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील विजेची समस्या गंभीर होती. या भागात मुसळधार पाऊस किंवा वादळ झाले की, महावितरणच्या सेवेचा खेळखंडोबा होत असे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चेतन ढवळ यांनी वारंवार महावितरण कंपनीकडे सुविधा सुरळीत करा, अशी मागण्या केल्या होत्या. चेतन ढवळ यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून घोटगे गावातील धोकादायक विजेचे खांब आणि वीजवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. यामुळे घोटगे गावातील पावसाळ्यात वीज समस्या उद्भवणार नाही.

शेअर करा