कुडाळ : मद्यधुंद स्थितीत ट्रेलर भरधाव वेगाने चालविणाऱ्या चालकांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

शेअर करा

महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल

कुडाळ,दि.२७ जून

मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ-पावशी येथे आज संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोन ट्रेलर भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात असल्याचे वाटवे क्रेन सर्व्हिसचे मालक मेहनील वाटवे यांच्या निदर्शनास आली. सदर दोन्ही ट्रेलर (एम एच ४६ सी एल ८३०४) आणि (एम एच ४६ डी सी ५०९८) हे सर्व वाहनांना हुलकावणी देत ओव्हरटेक करून भरधाव वेगाने जात होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून मेहनील वाटवे यांनी तत्काळ याची माहिती महामार्ग पोलीस विभाग कसाल कार्यालय येथे फोनद्वारे दिली. सदरची माहिती मिळताच तत्काळ ओसरगाव टोलनाका येथे कर्तव्यावर असणारे एएसआय/८७३ अनंत हडकर, पीएन/१२०८ अमोल महाडीक, पीएन/१३१९ कैलास ढोले, पीसी/१२२६ सूरज ठाकूर, पीसी/५०४ महादेव साबळे, पीसी/५६७ कुंडलिक वानोळे यांनी दोन्ही ट्रेलर कौशल्याने थांबून तपासणी केली असता दोन्ही वाहनावरील चालक हे मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळून आले. त्या दोन्ही वाहनचालकांवर (१. महादेव दशरथ तांबे; वय २७, रा. नफरवाडी, ता. पाटोदा, जिल्हा: बीड) आणि (२. ब्रह्मदेव विष्णू घुले नाईक, वय २७, रा. घुलेवाडी, ता. पाटोदा, जिल्हा: बीड) यांच्यावर तत्काळ महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी दीपाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी मेहनील वाटवे यांच्या प्रसंगाधावनामुळे आणि पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. वाहनचालक यांना महामार्ग पोलिस यांच्याकडून मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच विनाहेल्मेट कोणीही महामार्गावर वाहन चालून अपघातास निमंत्रण देऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे.

शेअर करा