नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार
कुडाळ: ,दि.२७ जुलै
पावसाळी हंगामात आजारांचे प्रमाण वाढत असते. यामध्ये डेंग्यू, कॉलरा, हिवताप यासारखे आजार डोके वर काढतात. हे आजार प्रामुख्याने डासांमुळे होत असतात. या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ पोलीस स्टेशन आवारात स्वखर्चाने डास (मच्छर) प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट, संदीप महाडेश्वर, अमित राणे, गुरु गडकर, लकी सावंत, सागर जाधव आदी उपस्थित होते.
नगरसेवक मंदार शिरसाट आणि कुडाळ शहर शिवसेना माध्यमातून कुडाळ शहरात अभिनवनगर न. २, वाघसावंत टेंब, सांगिरडेवाडी, लक्ष्मीवाडी, एसटी स्टँड येथे मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात आली आहे. शहरातील अन्य भागात सुद्धा ही फवारणी करण्यात येणार आहे. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या सामाजिक कार्याचे कुडाळ शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.