कुडाळ,दि.१७ जुलै
महामार्गावर वेताळ बांबर्डे- पावशी सीमेवर दुचाकी आणि छोटा टेम्पो यांच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ७.४५ च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची टेम्पोला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. सदर दुचाकीस्वार हा आवळेगाव (ता. कुडाळ) येथील असल्याचे समजते.
