कुडाळ,दि.३० जुलै
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूरतिठा येथे वन संरक्षण दिन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग, सिंधुदुर्ग व प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे सचिव नागेंद्र परब उपस्थित इतर मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे सहाय्यक वनरक्षक, (कुडाळ) वर्षा कोळेकर यांनी वनांचे महत्त्व व त्यांचे संरक्षण व संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल (कुडाळ) मनीषा कदम, वनक्षेत्रपाल, (कुडाळ) शकिल मुजावर, मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षिका दाभोलकर, शिक्षक एम. एस. पाटील, संस्था संचालक, सर्जेराव झेंडे, हरित सेना विभागप्रमुख लवू गावडे, नर्सरी उद्योजक, विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. जी. कर्पे यांनी केले. तर आभार शिक्षिका दाभोलकर यांनी मानले.