कुडाळ : तेंडोली केंद्र शाळा नं. १ येथे रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा संपन्न

शेअर करा

कुडाळ,दि.३० जुलै
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या कृषिकन्या गटाने तेंडोली केंद्र शाळा नं. १ येथे विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा आयोजित केली होती.
या दिवशी तेंडोली गावातील कृषिकन्या गटाने विविध रानभाज्यांची अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी करून त्यांचे माहिती तक्ते सादर केले. आजच्या या नवीन पिढीला रानभाज्यांचे महत्त्व समजावे हा त्यामागचा उद्देश होता.
या रानभाज्यांच्या प्रदर्शनाबरोबरच कृषी कन्या गटाने पाककृती स्पर्धेचे देखील आयोजन केले होते.


या स्पर्धेमध्ये देखील महिलांचा चांगला सहभाग होता.या स्पर्धेचे परीक्षण सुवर्णा विजय प्रभूतेंडोलकर यांनी केले. त्या गेली २० वर्षे विवीध कोकणी खाद्यपदार्थ बनवतात व त्यांचा स्वतःचा हॉटेलिंगचा छोटासा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे त्या विविध कोकणी पदार्थ जसे की मोदक, शिरवळ, पुरणपोळी यांची मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स घेतात. या स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्शक बक्षिसे देऊन
प्रथम क्रमांक – दिव्या दत्ताराम दुतोंडकर.
द्वितीय क्रमांक – रंजना रघुनाथ प्रभूतेंडोलकर.
तृतीय क्रमांक – वर्षा विश्वनाथ प्रभू. यांना गौरवण्यात आले.


या कार्यक्रमासाठी तेंडोली गावच्या सरपंच अनघा तेंडोलकर, ग्रामसेविका सुनीता कदम, गावातील इतर ग्रामस्थ व उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील प्राध्यापिका डॉ. जया वाघ, डॉ. नीलिमा पवार तसेच डॉ. गिरीश उईके सर व केंद्र शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका खोत व सर्व शिक्षक उपस्थित होते.
तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदेच्या विद्यार्थिनी –
नेहा प्रभुतेंडोलकर, निकिता प्रभुतेंडोलकर, प्रतीक्षा सुर्वे, सृष्टी पेंडूरकर, तन्मयी भगत, पल्लवी दाभोलकर, पूर्वा मुरकर, सिद्धी चौधरी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या मध्यमातून कृषी कन्यांनी नागरिकांना रानभाज्यांचे आहारात अधिकाधिक समावेश करण्याचे आवाहन केले.

शेअर करा