कुडाळ : श्री गावडेकाका महाराज यांच्या उपस्थितीत योग प्राणायाम कार्यशाळा संपन्न

शेअर करा

भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कुडाळ,दि. २१ जून

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडेकाका महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योग दिनाच्या कार्यक्रमाद्वारे महंत गावडेकाका महाराज यांनी योग आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे, यावर मार्गदर्शन केले. आजपर्यंत गावडे काका व त्यांच्या भक्त सेवान्यास यांच्यामार्फत १०० हून अधिक योगशिक्षक समाजाला दिले असून ते आपले कर्तव्य बजावत आहेत.


आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू होण्या अगोदर तीन वर्ष काकांच्या माध्यमातून दरवर्षी २१ जून रोजी योगा वर्ग घेतला जात होता. त्या दिवसाचे महत्त्व म्हणजे तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. योगायोग म्हणजे त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित करण्यात आलेला आहे.


या योग दिवसाला योग शिक्षक आनंद सावंत यांनी योगासंदर्भात मार्गदर्शन केले. योग कार्यक्रमात सुजय गावडे, भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष
श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजू राऊळ, महिला जिल्हा सरचिटणीस अदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा महिला तालुकाध्यक्ष कुडाळ आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी नगरसेवक राजू गवंडे, भक्तसेवा न्यास माड्याचीवाडी यांचे योगसाधक व योगशिक्षक उपस्थित होते.

शेअर करा