मालवण,दि.१५ ऑगस्ट
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे गावचे रहिवासी असलेले अजिंक्य रविंद्र कोतमिरे यांची मालवण गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
अजिंक्य कोतमिरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सातवे येथेच झाले. त्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून बी.ई. ही अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये यश संपादन केले. या परीक्षेतून त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाली. शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना आता त्यांची मालवण गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे मालवण तालुक्यातील शैक्षणिक प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.