मालवण : कांदळगावात नारळी पौर्णिमेनिमित्त २७ रोजी भव्य नारळ लढविणे स्पर्धा

शेअर करा

मालवण,दि.२३ ऑगस्ट

नारळी पौर्णिमेनिमित्त भाजप-शिवसेना महायुतीच्या वतीने गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री रामेश्वर मंदिर परिसर कांदळगाव येथे भव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम विजेत्यास जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब पुरस्कृत पारितोषिक ७००१ रुपये, द्वितीय क्रमांकास शिवसेना मालवण तालुका प्रमुख विनायक बाईत पुरस्कृत पारितोषिक ४००१ रुपये, तृतीय क्रमांकास २००१ रुपये, तर चतुर्थ क्रमांकास १००१ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे ही दोन्ही पारितोषिके शिवसेना पदाधिकारी अभिमन्यू लाड यांनी पारितोषिके पुरस्कृत केली आहेत या चारही पारितोषिके समवेत आकर्षक चषक देण्यात येणार असून हे चषक शिवसेना युवा सेना जिल्हाध्यक्ष श्री संग्राम साळसकर यांनी पुरस्कृत केले आहेत

या स्पर्धेस प्रमुख उपस्थिती म्हणून अलिबागचे प्रसिद्ध ‘नारळाचे बादशहा’ आसिफ भाई अलिबाग उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २६ ऑगस्टपूर्वी संतोष रमाकांत पारकर, मोबा ७४९८३९३०४१ / श्री योगेश राजन लाड, मोबा ८०१००५२९८३ यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा