नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांच्या पाठपुराव्याला यश
मालवण ,दि.२६ जुलै
गेल्या काही दिवसापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत असलेला मालवण शहरातील दांडी किनारा आवारवाडी परिसरातील हायमास्ट टॉवर
स्थानिक नगरसेविका तथा मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी केलेल्या सातत्यापूर्ण पाठपुराव्यामुळे पुन्हा कार्यान्वित झाला असून यामुळे संपूर्ण परिसर पुन्हा प्रकाशमान झाला आहे
मालवण शहरातील दांडी किनारा आवारवाडी येथील हायमास्ट टॉवर काही तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत होता. त्यामुळे स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटक तसेच पर्यटन व्यावसायिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेविका तथा मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून नगरपरिषदेच्या निधीतून हायमास्ट टॉवरची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून तो पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर पुन्हा प्रकाशमान झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब, नरेश कोयंडे, बाप्पा काळसेकर, मिकी डिसोजा, परेश वाघ, किरण कोयंडे, भूषण काळसेकर, रॉबर्ट फर्नांडिस, बाबू फर्नांडिस यांच्यासह स्थानिक नागरिक, मच्छिमार आणि पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
हायमास्ट टॉवर सुरू झाल्याने दांडी किनारा परिसरातील सुरक्षिततेत भर पडणार असून रात्रीच्या वेळी नागरिक, पर्यटक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.