मालवण ,दि.१४ ऑगस्ट
मालवणच्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनचा आठवा वर्धापन दिन सोहळा दि. १५ ऑगस्ट रोजी मालवण वायरी येथील श्री देवी केळबाई सभागृहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार होता, मात्र काही अपरिहार्य कारणामुळे १५ रोजी होणारा हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाची नवी तारीख कळविण्यात येईल, अशी माहिती मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लुडबे आणि सेक्रेटरी श्री. दादा वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.