मालवण : आईच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांचे तैलचित्र मठाला भेट

शेअर करा

चित्रकार श्रीराज बादेकर यांचा आगळावेगळा उपक्रम; साळेल येथील स्वामी मठाला कॅनव्हासवरील आकर्षक चित्र अर्पण.

मालवण,दि.०३ जुलै

मालवण मधील चित्रकार श्रीराज बादेकर यांनी कॅनव्हासवर तैलरंगातून साकारलेले श्री स्वामी समर्थ यांचे आकर्षक चित्र आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त साळेल येथील स्वामींच्या मठाला भेट म्हणून अर्पण केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

मालवण मधील बादेकर कुटुंबाला कलेचा उज्ज्वल व समृद्ध असा वारसा लाभला आहे. या कुटुंबातील प्रसिद्ध निसर्गचित्रकार श्रीधर बादेकर यांचे श्रीराज बादेकर हे पुतण्या होत. चित्रकार श्रीराज बादेकर यांनी मुंबई येथील रहेजा स्कूल ऑफ आर्ट, बांद्रा येथून कला शिक्षण पूर्ण केले आहे. विविध प्रकारची चित्रे रेखाटताना एक प्रतिभावान चित्रकार म्हणून श्रीराज बादेकर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. बादेकर कुटुंबाला लाभलेला कलेचा वारसा श्रीराज बादेकर यांनीही आपल्या कलाकृतींद्वारे समर्थपणे पुढे नेला असून त्यांनी रेखाटलेले स्वामी समर्थ यांचे तैलचित्र सर्वांचे आकर्षण ठरत आहे. हे चित्र त्यांनी स्वामी मठाला अर्पण केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी साळेल येथील स्वामी समर्थ मठाचे मालक विजय लोके, राजन बादेकर, राजश्री बादेकर, निनाद बादेकर, सोनाली बादेकर, नाट्य अभिनेत्री शुभदा टीकम, अद्वैत टीकम आदी उपस्थित होते.

शेअर करा