मालवण ,दि. २१ जून
मालवण सोमवारपेठ येथील जेष्ठ मूर्तीकार, रिक्षा व्यावसायिक श्री दत्तात्रय उर्फ सुनील शशीकांत वायंगणकर (वय ५७) यांचे शनिवारी रात्री उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले. मालवण शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मालवण शहरावर शोककळा पसरली आहे.
मालवण बाजारपेठ येथे राहणारे सुनील वायंगणकर हे कुशल मूर्तिकार म्हणून ओळखले जायचे
पंधरा ते वीस फूट उंचीच्या मुर्त्या बनविण्यात त्यांचा हातखंडा होता रिक्षा व्यवसायबरोबरच सामाजिक सेवेची जाण ठेवून काम करणाऱ्या सुनील वायंगणकर यांच्यावर उपचार सुरु असतानाच निधन झाले
त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता मालवण बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, बहिण, भाऊजी असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार दिलीप वायंगणकर यांचे ते मोठे बंधू तर प्रथमेश वायंगणकर यांचे ते वडील होत.