मालवण : विद्यार्थ्यांनी एआयच्या युगात योग्य क्षेत्राची निवड करावी; आमदार सुनील प्रभू यांचे मार्गदर्शन

शेअर करा

काळसे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन; विनम्रतेसोबत ज्ञान आत्मसात करा, यशस्वी झाल्यावर शाळेचे ऋण विसरू नका, असा दिला संदेश.

मालवण ,दि.२३ जुलै

विनम्र व्यक्तीलाच विद्या, ज्ञान शोभून दिसते हे विद्यार्थ्यांनी नेहमी ध्यानात ठेवून ज्या पद्धतीने जग धावतंय, देशात जी प्रगती होतेय, त्या ए आयच्या प्रगतीच्या काळात कोणतं क्षेत्र निवडावं हे विचारपूर्वक ठरवावे विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था, शिक्षक, तुमचे आई वडील सदैव तुमच्या पाठीशी आहेत. भविष्यात तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल, तेव्हा तुम्ही तुमच्या शाळेकडे मागे वळून पहा असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष, मुंबईचे माजी महापौर आणि विद्यमान शिवसेना आमदार व मुख्य प्रतोद श्री. सुनिल प्रभु यांनी काळसे हायस्कूल येथे बोलताना केले.

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ, काळसे संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे च्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेचे उदघाट्न आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते आणि pबॅ. नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी भूषविले होते

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, सह सचिव शरद गोसावी, संचालक व कनिष्ठ महाविद्यालय उपाध्यक्ष राजन प्रभु , संचालक सिताराम परब, डाॅ. शरदचंद्र काळसेकर, उमेश प्रभु, शिवनंदन प्रभु, कमलेश गोसावी, सल्लागार केशव सावंत, विद्यार्थी सेवा संस्थेचे सह सचिव पंढरीनाथ प्रभु, मुख्याध्यापक अविनाश परब, सातेरी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन परशुराम गुराम, श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार समितीचे सह सचिव संदिप माडये, संस्थेचे माजी संचालक सुवर्णा काळसेकर, सुधीर प्रभु, चिंतामणी प्रभु, हडप गुरूजी, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र परब, गोसावी , माईणकर मॅडम, आचरेकर मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मुख्याध्यापक अविनाश परब यांनी प्रास्ताविक केले

यावेळी प्रा. अरुण मर्गज यांनी मोबाईलचा, सोशल मिडीयाचा वापर हा चांगले ज्ञान मिळवण्यासाठी करा, त्याच्या आहारी जावू नका. तुमची शिक्षण संस्था ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारी शिक्षण संस्था आहे. जेव्हा जेव्हा ज्ञान घेण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करा, कारण तुमची प्रगती तुमच्या शाळेचा आणि आईवडिलांचा नावलौकिक वाढवत असते असे सांगितले तर संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रशालेत आयोजित केल्या जाणा-या शिबिरांना उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा तसेच प्रशालेतून शिकून बाहेर पडल्यानंतर माजी विद्यार्थी सेवा संस्थेत सहभागी व्हा आणि शाळेला योगदान दयावे असे आवाहन केले

यावेळी आमदार सुनिल प्रभु आणि प्रा. अरुण मर्गज यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रशालेतील १० वी आणि १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी उपक्रमशील शिक्षक नरेश कांबळे आणि स्नेहा सरमळकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
सूत्रसंचालन सौ. सायली मोरे यांनी केले तर आभार केशव सावंत यांनी मानले.

शेअर करा