मालवण–सिंधुदुर्ग किल्ला जलप्रवासी सेवा प्रकल्पाच्या उद्देशपत्र वितरणाचा समारंभ ३१ जुलैला

शेअर करा

देवबाग भवन येथे होणार कार्यक्रम; मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवेला चालना.

मालवण ,दि.३० जुलै

मालवण बंदर जेट्टी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्देशपत्र (Letter of Intent) वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता देवबाग भवन, मालवण येथे करण्यात आले आहे.

या समारंभाला माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय, बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मालवण बंदर जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार असून, पर्यटनाला चालना मिळण्यासह स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध
होणार आहे. या उपक्रमामुळे मालवणच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमाचे आयोजन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले असून, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर तसेच महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा