मसुरे येथे अपूर्व उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा!

शेअर करा

मसुरे,दि.१५ ऑगस्ट (झुंजार पेडणेकर)

मसुरे येथील आर. पी.बागवे हायस्कुल येथे देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, पंढरीनाथ नाचणकर तसेच शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ” हर घर तिरंगा, प्रमाणेच मनमन तिरंगा ” अशी भावना आपण सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेले नसून हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक विरानी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे. आपल्या देशाप्रती प्रेम आणि निष्ठा आपण सर्वांनी बाळगणे आवश्यक आहे. व्यसना पासून नेहमी दूर राहा असे यावेळी अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब म्हणाले. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सांगितिक कवायतीचे सादरीकरण केले. आभार सहाय्यक शिक्षक रमेश पाताडे यांनी मानले.

शेअर करा